मुंबई : इलेक्ट्रॉनिक ब्रॅण्ड्समध्ये जागतिक आघाडी घेतलेल्या टीसीएल या ब्रॅंडने फिल्पकार्टच्या बिग बिलियन डे सेलमध्ये आपल्या आयफाल्कन स्मार्ट एलईडी टीव्हींवर ६०% पर्यंत सवलत जाहीर केली आहे. हा सेल फ्लिपकार्टवर २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत चालेल.
या फेस्टिव्ह सेलदरम्यान ३२इंची एचडी रेडी आयफाल्कन ३२एफ२ए स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही (18,999/-रु), ज्याच्यात क्रोमकास्ट आणि क्वाड-कोर प्रोसेसर आहे, तो फक्त १०,४९९/- रुपयांत उपलब्ध असेल. ४० इंची स्मार्ट टीव्हीचे मॉडेल (26,999/- रु), फक्त १६,४९९/- रुपयांत उपलब्ध असेल, तर ४९ इंची मॉडेल (४०,९९०/-रु), फक्त २४,९९०/- रुपयांत उपलब्ध असेल. आपल्या अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स सक्षम नवीन अँड्रॉइड पाय (९.०) टीव्ही श्रेणी के३१ सिरिजमध्ये आयफाल्कन ४३ इंची ४३के३१ (४४९९० रु) २०,९९९/-रुपयांत. तर ५० इंची (५८,९९०/- रु) आणि ५५ इंची (७०,९९०/- रु) प्रकार अनुक्रमे २४,९९०/- आणि २७,९९०/- रुपयांत उपलब्ध असतील.
दुसरीकडे, आयपीक्यू इंजिन असलेल्या अँड्रॉइड टीव्ही ६५के२ए (९९,९९९/- रु) ची ऑफर किंमत असेल ५०% सवलतीनंतर ४९,९९०/- रु. तर ६५ इंची क्यूएलईडी, ज्यात ओएनकेवायपी स्पीकर आहेत, तो ६५व्ही२ए (2,29,990 रु) हा ६९,९९९/- रुपयांत आणि ७५ इंची २०१९ मधील पुरस्कार-प्राप्त मॉडेल ७५ एच२ए (२,३९,९९९/- रु) स्मार्ट टीव्ही ज्यामध्ये क्रोमकास्ट आहे, तो १,३९,९९९ रुपयांत घेता येईल.
आयफाल्कन स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, हॉटस्टार, वूट, यूट्यूब, झी5, ऑल्ट बालाजी, सन एनएक्सटी, हंगामा प्ले, इरॉस नाऊ, जिओ सिनेमा आणि सोनी लिव तसेच इतर ग्राहक-केंद्रित अॅप्लिकेशन आहेत व अधिकृत अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमद्वारा पावर्ड आहे व त्यात आधीपासूनच गूगल प्ले स्टोअर आहे. प्राइम व्हिडिओ लवकरच त्यात सामील होणार आहे, ज्यात आयफाल्कनचे ओव्हर-द-एअर अपडेट असतील. सर्व आयफाल्कन टीव्ही गूगल असिस्टन्टद्वारा समार्थित आहेत व त्यांच्यात रिमोट आधारित व्हॉईस सर्च फीचर आहे. व्हॉईस सर्च हे केवळ प्रमाणित अँड्रॉइड टीव्हींमध्येच उपलब्ध असते. तर, लिनक्स किंवा ओपन-सोर्स अँड्रॉइड टीव्हीमध्ये अनेक ब्रॅण्ड्स असतात.