रत्नागिरी, प्रतिनिधी : हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीच्या वतीने मिशन होप या मोहिमेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रूग्णांसाठी सहा व्हेंटिलेटरची मदत केली आहे.हे सहा व्हेटिंलेटर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनी मिशन होप मोहिमेच्या अंतर्गत संपूर्ण देशात कोरोना रूग्णांसाठी मदत कार्य करत आहे.जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरात हिंदुस्तान युनिलिव्हरचा प्लांट आहे.आज येथील एच आर मॅनेजर सोमशुभ्रा हंस यांनी सहा व्हेंटिलेटर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले,हिंदुस्तान युनिलिव्हरचे अमोल आमटे उपस्थित होते.यापूर्वी कंपनीने वक्रतुंड लाईफ़ केअर हॉस्पिटला २५ आयसीयु बेड आणि व्हेंटिलेटर तसेच चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलला ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर आणि व्हेटिंलेटरची मदत केली आहे.