मुंबई : मुलुंडला एकाच दिवशी तब्बल ५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. रामगड, इंदिरा नगर आणि अमर नगर या झोपडपट्टी वसाहतीत
४५ कोरोनाबाधित रुग्ण तर अन्य भागातून ७ रुग्ण सापडले. एकाच दिवशी रुग्णांची संख्या ५२ वर पोहचल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
रामगड, इंदिरा नगर आणि अमर नगर या झोपडपट्ट्या म्हणजे अतिशय चिंचोळ्या गल्ल्या आणि दाटीवाटीच्या आहेत. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. यानंतर पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवसांपूर्वी या परिसरातील लक्षणे दिसणाऱ्या ५३ जणांची चाचणी घेतली. त्यापैकी ४५ जण कोरोनाबाधित होते. त्यांचा अहवाल रविवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. मुलुंडच्या अन्य भागातून सर्व्हे केला गेला. त्यात ७ जण कोरोनाबाधित सापडले.
या कोरोनाबाधितांना मिठागर पालिका शाळेतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
या परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी केली जाईल, अशी माहिती टी वार्डचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी दिली.