नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलीस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 51 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांचा यात समावेश आहे. यामध्ये ८ शौर्य पदके, 3 राष्ट्रपती पोलीस पदके आणि 40 पोलीस पदकांचा समावेश आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशातील एकूण 942 पोलीस अधिकारी कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेसाठी विविध पदके जाहीर केली. देशभरातून शौर्यासाठी 2 राष्ट्रपती पोलीस पदके, शौर्यासाठी 177 पोलीस पदके, उत्कृष्ट सेवेसाठी 88 राष्ट्रपती पोलीस पदके आणि उत्कृष्ट सेवेसाठी 675 पोलीस पदके जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील 51 पोलीस अधिकारी कर्मचा-यांना ही पदके जाहीर झाली आहेत. तसेच राज्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दोन अधिका-यांनाही पोलीस पदके जाहीर झाले आहेत. मुंबई येथील राखीव पोलीस दलाचे निरीक्षक राधेश्याम पांडे आणि नागपूर चे उपनिरीक्षक सुरेश कुमार थापा यांना ही पोलीस पदके जाहीर झाली आहेत.
राज्यातील ३ पोलीस अधिकारी –कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके
शिवाजी तुळशीराम बोडखे ,सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर, नागपूर, दयानंद हरिश्चंद्र ढोमे , पोलीस निरीक्षक, चतुश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, पुणे, श्री. बाळु प्रभाकर पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्ष, नाशिक शहर.