नवी दिल्ली : स्वच्छता सर्वेक्षणाचा निकाल गुरूवारी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी जाहीर केला. यात आंतरराष्ट्रीय शहर अशी ओळख असलेली मुंबई २९ व्या क्रमांकावर गेली आहे. देशातल्या पहिल्या १० स्वच्छ शहरामध्ये नवी मुंबई आठव्या स्थानावर आहे. महाराष्ट्रातील एकूण ४४ शहरे स्वच्छता सर्वेक्षणाच्या यादीत समाविष्ट आहेत. तर इंदूर शहराने प्रथम क्रमांक पटकावला.
स्वच्छ सर्वेक्षण-२०१७ अंतर्गत देशभरात केलेल्या सर्वेक्षणात ४३४ शहरे स्वच्छतेच्या क्रमवारीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या यादीत महाराष्ट्रातील ४४ शहरांचा समावेश आहे. नायडू यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार देशातील विविध शहरांची यादी गुरुवारी जाहीर केली. यामध्ये पहिल्या स्थानावर मध्यप्रदेशातील इंदूर शहर असून अनुक्रमे भोपाळ, विशाखापट्टणम, सुरत, म्हैसूर, तिरुचिरापल्ली, नवी दिल्ली, नवी मुंबई, तिरुपती आणि बडोदा या शहरांचा टॉप टेनच्या यादीत समावेश आहे.
मराठवाड्यातील ८ शहरांचा समावेश
विदर्भातील ९ शहरांचा समावेश
नवी मुंबई (८), पुणे (१३), बृहन्मुंबई (२९), शिर्डी (५६), पिंपरी चिंचवड (७२), अंबरनाथ (८९), सोलापूर (११५), ठाणे (११६), धुळे (१२४), मिरा भाईंदर (१३०), वसई विरार (१३९), इचलकरंजी (१४१), नाशिक (१५१), सातारा (१५७), कुळगाव बदलापूर (१५८), जळगाव (१६२), पनवेल (१७०), कोल्हापूर (१७७), अहमदनगर (१८३), उल्हासनगर (२०७), कल्याण-डोंबिवली (२३४), सांगली-मिरज कुपवाड (२३७), मालेगाव (२३९), भिवंडी निझामपूर (३९२), भुसावळ (४३३).