रत्नागिरी : राज्यात परिवर्तन अटळ असून पाच वर्षात रत्नागिरी ची नवी ओळख निर्माण होईल पर्यटनातून रोजगार आणि पर्यावरण पूरक उद्योग धंदे भविष्यात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात येतील असा विश्वास राष्ट्रवादीचे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुदेश मयेकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.
पक्षाच्या स्थापनेपासूनच मी राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता आहे, असे सांगत ते पुढे म्हणाले की पडत्या काळात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पक्षाला सावरण्याचे काम प्रामाणिकपणे माझ्याकडून झालं. आजवर केलेल्या कार्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली म्हणूनच आज पक्षाचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा भविष्यात मला काय करायचे त्याचे नियोजन मी आणि माझ्या पक्षाने केलेला आहे. 21व्या शतकात सर्वात मोठी समस्या आहे ती बेरोजगारीची आणि आज कोकणात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. कारखानदारी पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे येथील तरुणांच्या हाताला काम मिळाले नाही. रत्नागिरीतील बेरोजगारी दूर करण्याचा एक मोठे लक्ष आपल्यासमोर असेल राज्यात परिवर्तन झाल्यानंतर पुढील पाच वर्षात रत्नागिरी ची नवी ओळख निर्माण झालेली पाहायला मिळेल.
कोकणाला निसर्गाचे वरदान लाभले येथील निसर्ग भुरळ पडत असतो मात्र या पर्यावरणाला साजेसे उद्योग निर्माण होणे गरजेचे होते. परंतु ते झाले नाहीत ते का झाले नाहीत यावर भाष्य करण्यापेक्षा परिवर्तन अंतर पर्यावरण पूरक उद्योग धंदे निर्माण करून पर्यटनाला देखील चालना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार असल्याचे मयेकर यांनी सांगितले.
कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारच्या औद्योगिक संस्था येत असताना येत असताना प्रस्थापित लोकांच्या दुर्लक्षामुळे येथील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत यावर गांभीर्याने विचार केलेला आहे.
क्षेत्रांमध्ये कोकणातील तरुणांची कमतरता दिसून येते येथील मच्छिमार शेतकरी सर्वच बाबतीत उपेक्षित राहिला आहे. कालानुरूप बदल घडणे गरजेचे आहे आणि हे बदल पक्षाच्या माध्यमातून आम्ही नक्कीच घडणार असल्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुदेश मयेकर यांनी सांगितले.
या मतदारसंघाचा विकास करताना कल्याणकारी योजना आरोग्यसुविधा त्याचबरोबर कला क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राला देखील चालना देण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम हाती घेऊन नवा बदल घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्वसामान्य जनतेचे आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातील त्याचबरोबर जिल्हा रूग्णालय सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला सबलीकरणाच्या मत करिता बचत गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतली जाणार आहेत. महिलांच्या बचत गटांनी तयार केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून भविष्यात या मतदारसंघात बचत गटाच्या माध्यमातून महिलाच चांगली क्रांती घडवतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.