महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेशास राज्य मंत्रिमडळाची मान्यता
पारंपरिक मच्छीमारांच्या हिताचे संरक्षण हेच सरकारचे प्राधान्य – अस्लम शेख
मालाड ,ता.6(निसार अली ) : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेशास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली असून एलईडी आणि पर्ससीन मासेमारी तसेच महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात घुसून अवैध मासेमारी करणाऱ्यां परराज्यांतील नौकांविरोधात कठोरात -कठोर दंडात्मक तरतुदी करण्यात आल्याने हा नवा कायदा पारंपारीक मच्छीमारांच्या हिताचा ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी काल सह्याद्री अतिथिगृहावर आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान केले.