
रत्नागिरी,13 July : विजबिल वसुलीत नेहमी अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊनमुळे महावितरणची कोट्यावधींची विजबिल वसुली रखडली आहे. या दरम्यान अनेकांना भरमसाठ बिलं आली होती, त्यावरून वादही झाले, या वादात रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 72 हजार 623 ग्राहकांची वीजबिलं थकीत आहेत. यामुळे 72 कोटी 45 लाख 38 हजार रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीत रत्नागिरी विभागातील 32 हजार 307 घरगुती ग्राहक आहेत. यांच्याकडे 44 कोटी 24 लाखांची रक्कम थकित आहेत.
1 हजार 495 स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सहा कोटी 43 लाख रुपये , वाणिज्यिक विभागातील 22 हजार 832 ग्राहकांकडे आठ कोटी 70 लाख 9 हजार रुपये, औद्योगिकच्या 3375 ग्राहकांकडे पाच कोटी 12 लाख 70 हजार रुपये , सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या 2483 ग्राहकांकडे तीन कोटी 94 लाख 48 हजार , कृषिपंपाच्या 7 हजार 994 ग्राहकांकडे एक कोटी 56 लाख 9 हजार रुपये , सार्वजनिक विभागातील 4889 ग्राहकांकडे दोन कोटींहून अधिक थकित आहेत. अन्य 545 ग्राहकांकडे 36 लाख 17 हजार रुपयांची थकबाकी आहे.
त्यामुळे थकीत बील वसुल करण्याचे आवाहन महावितरण समोर असणार आहे.