रत्नागिरी, 19 August : जिल्ह्यात 24 तासात सरासरी 36.77 मिमी. पाऊस तर एकूण 330.90 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 49.50 मिमी, दापोली 38.70 मिमी, खेड 33.90 मिमी, गुहागर 35.60 मिमी, चिपळूण 47.70 मिमी, संगमेश्वर 45.40 मिमी, रत्नागिरी 19.10 मिमी, राजापूर 35.40 मिमी, लांजा 25.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 19 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती खालीलप्रमाणे आहे.
संगमेश्वर तालुक्यातील मौजे कोंडे येथील सुरेश आत्माराम शिंदे यांचा बैल वीजेचा शॉक लागून मृत झाला आहे.