मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी होणार्या निवडणुकीत २२६७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ३६७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. या आधी २६३४ जणांनी अर्ज भरले होते. २१ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे.
२७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली. ३ फेब्रुवारीला अखेरच्या दिवशी २८७९ नामनिर्देशन पत्रे भरली गेली. त्यातील उमेदवारांची संख्या २७७४ एवढी होती. त्यापैकी २६३४ अर्ज वैध ठरले. तर छाननीनंतर १४० अर्ज बाद झाले. मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ३६७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.