निफ्टी १० हजारांच्या पातळीपुढे तर सेन्सेक्सची ४२९.२५ अंकांनी वृद्धी
मुंबई, 2 जुलै : आयटी, इन्फ्रा, ऑटो आणि एनर्जी सेक्टरमध्ये खरेदी दिसून आल्याने भारतीय बाजाराला आज सलग दुस-या दिवशी बळकटी मिळाल्याचे दिसून आले. निफ्टी १२१.६५ अंकांनी वधारून १०,५५१.७० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ४२९.२५ अंकांनी वाढून ३५,८४३.७० अंकांवर विसावला.
एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात जवळपास १६८३ शेअर्सनी नफा कमावला, १०३९ शेअर्सची घसरण झाली तर १२५ शेअर्स स्थिर राहिले. एमअँडएम (६.४२%), हिरो मोटोकॉर्प (५.२०%), टायटन कंपनी (३.८०%), टाटा स्टील (३.२३%) आणि इन्फोसिस (३.२९%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर अॅक्सिस बँक (१.९५%), वेदान्ता (०.८८%), एचयूएल (०.६२%), झी एंटरटेनमेंट (०.०९%) आणि युपीएल (१.००%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. या सर्व घटकांमुळे निफ्टी बँक वगळता सर्व सेक्टर्स हिरव्या रंगात दिसून आले. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप हे अनुक्रमे १.०४% आणि ०.९२% नी वधारले.
भारतीय रुपयाने मार्च २७ पासून आतापर्यंत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७५.०१ रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली. आजच्या व्यापारी सत्रात तेलाच्या दरांनी तीव्र घसरण अनुभवली. अमेरिकेने एका दिवसात कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याची नोंद केल्यानंतर हे परिणाम दिसून आले. कोव्हिड-१९ लसीवरील चाचणीच्या निकालामुळे गुंतवणूकदारांमध्ये त्वरित आर्थिक सुधारणेच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. त्यामुळे मागील सत्रात वाढलेले सोन्याचे दर आजच्या व्यापारी सत्रात घटले.
जगभरात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना जागतिक शेअर बाजारात सकारात्मक संकेत दिसून आले. प्राथमिक टप्प्यातील लस चाचणीमुळेही व्यापारी आणि गुंतवणुकदारांमध्ये सकारात्मक भावना दिसून आल्या. नॅसडॅकचे शेअर्स ०.९५%, एफटीएसई १०० चे ०.६४%, एफटीएसई एमआयबीचे १.७९%, निक्केई २२५ ते शेअर्स ०.११% तर हँगसेंगचे शेअर्स २.८५% नी वाढलेले दिसून आले.