
मुंबई । कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आज विक्रोळीत कोरोनाचे आणखी दोन नवे रुग्ण सापडले. त्यातील एक कन्नमवार नगरमध्ये 40 वर्षीय महिला तर टागोर नगरमध्ये 63 वर्षीय पुरुष आहे.
याआधी टागोर नगरमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला होता. आज शुक्रवारी पुन्हा येथे एक रुग्ण सापडला. कन्नमवार नगरमधील महिला परिचारिका असल्याचे बोलले जाते. दोन्ही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबियांचीही तपासणी केली जाणार आहे.
आता मुंबई पालिकेच्या एस वार्डमधील कोरोना रुग्णांची संख्या 22 वर पोहचली आहे. रुग्णांच्या आजुबाजुचा परीसर सील करण्यात आला आहे.















