
३,००० पेक्षा जास्त मालगाड्यांमधून १.४७ लाख वॅगन्सची वाहतूक
मुंबई. 27 मे : कोविड -१९ लॉकडाऊन दरम्यान मध्य रेल्वेचे योद्धा कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम उत्पादने, खते, कंटेनर इत्यादी आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी २४×७ सतत प्रयत्न करत आहेत. गेल्या ६० दिवसांत ३००० मालगाड्या चालवल्या आहेत. वॅगनच्या बाबतीत, ३,००० मालगाड्यांची संख्या १,४७,४७१ वॅगन इतकी होते. या लॉकडाऊन दरम्यान दररोज सरासरी २,४०० वॅगन लोड करण्यात आल्या. मध्य रेल्वेने मागील ६० दिवसात ७.६ दशलक्ष टन मालवाहतूक केली
मध्य रेल्वेने देशातील वीजपुरवठा खंडित न करण्यासाठी ५९,४८७ वॅगन कोळसा वीज प्रकल्पात नेले; वेळेवर वितरणासाठी धान्य व साखर यांचे १,८१९ वॅगन; खते ५,८६१ वॅगन आणि कांद्याची ५८७ वॅगन; सर्व भागधारकांना इंधन सुरळीत पुरवठा करण्यासाठी पेट्रोलियम उत्पादनांची टँक वॅगन १४,०४२; उद्योगांकरिता २,३४९ वॅगन लोखंड व स्टील, ५१,२१५ कंटेनर वॅगन आणि इतर विविध उत्पादनांच्या सुमारे ६,६९६ वॅगन यांची वाहतूक केली.