
रत्नागिरी,( विशेष प्रतिनिधी) : गणेशोत्सवात यावर्षी 182 जादा गाड्या कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात येणार आहेत. या काळात जांण्याचे प्रमाण प्रचंड असते. चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेता; कोकण रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आता नवीन सहा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर जादा डब्बेदेखील गाडीला जोडण्यात येणार आहेत. यापुर्वी जादा गाड्या जाहिर करुनही आरक्षण फुल झाल्यानं या गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनल – झाराप – लोकमान्य टिळक टर्मिनल, पुणे-सावंतवाडी- पुणे, पुणे- सावंतवाडी -पनवेल, पनवेल – सावंतवाडी – पनवेल ,पुणे – सावंतवाडी – पनवेल, पनवेल – रत्नागिरी – पुणे या सहा गाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत.