रत्नागिरी दि.13:- राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2021 आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर 17 व 18 ऑगस्ट 2021 रोजी कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म 01 जानेवारी 1999 नंतरचा असावा. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी http://kaushalya.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर 15 ऑगस्ट 2021 पूर्वी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे. सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करुन निवड केलेल्या उमेदवारांची पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकास केंद्र, रत्नागिरी (दूरध्वनी क्रमांक 02352-221478) अथवा कौशल्य विकास समन्वयक नागेश सितारे (मो.क्र. 9970520250) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र, रत्नागिरी यांनी केले आहे.















