मालाड, ता.25(वार्ताहर) : अंधेरी पश्चिमेत आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली भारती आरोग्य निधी रुग्णालयात 1500 नागरिकांच लसीकरण करण्यात आलं. प्रसंगी अमित साटम, के/पी विभाग समिती अध्यक्षा सुधा सिंग, स्थानिक नगर सेवक रेणू हंसराज, रोहन राठोड, अनिश माकणे, विठ्ठल बांदेरी, दीपक कोतेकर, दीपक शहा, भवन कामतेकर, मुकेश चौहान, मनीष सोळंकी, इत्यादींच्या देखरेखी खाली हे लसीकरण यशस्वी झाले. हे लसीकरण प्रभाग क्रमांक64, 65, 66, 67 मधील लोकांसाठी करण्यात आले होते.