डोंबिवली, (प्रशांत जोशी) : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लोढा हेरिटेज को– ऑप हौसिंग सोसायटी असोसिएशन लिमिटेडच्या माध्यमातून भव्य कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे 150 फूट उंचीवर राष्ट्रध्वजारोहण 8 गोरखा रायफल्स निवृत्त कर्नल सी.आर. देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे.
लोढा हेरिटेज अंतर्गत दि. 25, 26, 27 जानेवारी असा तीन दिवस होणाऱ्या कार्यक्रमात भव्य मॅरेथॉन स्पर्धा, भव्य प्रभात फेरी, लेझीम पथक, ढोल ताशा, विविध खेळांचे आयोजन केले आहे. खेळांमध्ये बॉक्स क्रिकेट स्पर्धा, तीन पायांची रेस, रांगोळी स्पर्धा, व्हाली वॉल, निबंध लेखन स्पर्धा, 100 मीटर रेस, बटमिंटन, वकृत्व स्पर्धा, फुटबॉल, बुद्धिबळ स्पर्धा, रस्सी खेच, जलतरण स्पर्धा आणि चित्रकला आदी स्पर्धांचे आयोजन केले आहे.
लोढा हेरिटेज होणाऱ्या कार्यक्रमात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मनसे नेते प्रमोद (राजू) पाटील, आमदार सुभास भोईर, महापौर विनिता राणे, आयुक्त गोविंद बोडके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे 150 फुट ध्वजारोहण उंचीबाबत माहिती देतांना संस्थेचे उपाध्यक्ष नासीर खान यांनी सांगितले की, ध्वजारोहणबाबत ज्या नियमावली आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे. ध्वजस्तंभ परिसरात कायम स्वरूपी लाईट व्यवस्थेसाठी जनरेटरची व्यवस्था केली आहे. कारण अंधारात ध्वज राहता कामा नये. चबुतराच्या चारी बाजूला ग्रीलचे कंपाऊंड उभारण्यात आले आहे. ध्वज उंचीसाठी कोलकाता येथील आकाश कंपनीचे सहकार्य मिळाले असून 150 फूट उंचीसाठी पाईप जोडण्याचे काम सुरु आहे. हेरिटेज येथील गार्डनमध्ये याविषयी काम होत असून दोन इंजिनीअरच्या नेतृत्वाखाली क्रेनच्या साहाय्याने चार कामगार काम करीत आहेत. दावडी येथील फ्लग कंपनी ध्वज बनविण्याचे काम केले