रत्नागिरी (आरकेजी): महाडमधून शिकारीसाठी मंडणगड तालुक्यात आलेल्या १३ शिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या शिकाऱ्यांकडून एक रायफल, एक बारा बोअर, चार काडतुसे आणि तीन सर्च लाईट पोलिसांनी जप्त केल्या.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात हे तेरा शिकारी रायगड जिल्ह्यातल्या महाडमधून शिकारीसाठी आले होते. वनविभागाला एक निनावी फोन टोल फ्री नंबरवर आला. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना जाग आली आणि त्यानंतर वनविभागाने कारवाई केली.किरडे गावात वनविभागाने ही धडक कारवाई केली. दरम्यान, शिकाऱ्यांकडून एक ससा व वाहन जप्त केले.