
रत्नागिरी, (आरकेजी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला. यंदा संपूर्ण राज्यात कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.२० टक्के लागला. तसेच यावेळच्या निकालातही मुलींनी आघाडी कायम राखली. या वर्षी राज्याचा निकाल ८९.५० टक्के लागला. मागील वर्षीच्या तुलनेत २.९० टक्के वाढ झाली. मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.२१ टक्के लागला आहे.
फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये परिक्षा घेण्यात आली होती. आज मंगळवारी दुपारी १ वाजता बारावीचा आॅनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळांची माहिती मंडळाने अगोदरच जाहीर केली होती. विद्यार्थ्यांना निकाल समजला असला तरी गुणपत्रिका ९ जूनला दुपारी तीन वाजता कनिष्ठ महाविद्यालयात वितरित केल्या जातील, अशी माहिती मंडळाने दिली.
कोकण विभागीय मंडळाची सन २०१२ साली झाली़. तेव्हापासून सलग ६ वर्षे कोकण विभाग इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालात राज्यात अव्वल येण्याचा मान मिळवला आहे़. यावर्षीही कोकण विभागाचा निकाल ९५.२० टक्के इतका लागला़. मागील वर्षीच्या तुलनेत ही टक्केवारी १.९१ इतकी अधिक आहे़. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेने ४.१६ टक्के इतके आहे़. एकूण ३२,०३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.मुलींची संख्या १५ हजार ५३४ तर मुलांची संख्या १६ हजार ५०५ होती. १५ हजार ३७९ विद्यार्थी उतीर्ण झाले तर १५ हजार १२१ विद्यार्थीनी उतीर्ण झाल्या. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ५९ परिक्षा केंद्रवार परिक्षा घेण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यात मुलींच्या टक्केवारीचे प्रमाण ९७.०४, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९७.८९ इतके आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून एकूण २०,८११ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. १९,६६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण ११,२२८ विद्यार्थी परिक्षेला बसले. त्यापैकी १०,८३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
रत्नागिरी जिल्ह्याचा शाखानिहाय निकाल : (आकडेवारी टक्क्यांमध्ये)
विज्ञान – ९६.८५ टक्के, कला – ९८.८८ टक्के, वाणिज्य – ९६.९६ टक्के, एमसीव्हीसी – ९६.५२
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शाखानिहाय निकाल
विज्ञान – ९८.६, कला – ९१.४० वाणिज्य – ९८.८४, एमसीव्हीसी – ९५.२१