कोईम्बतूर : महाशिवरात्री निमित्त आदी योगी म्हणजेच शंकराच्या ११२ फुट उंच मुर्तीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. महाशिवरात्री हा शंकराचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. अंधाराकडून प्रकाशाकडे हा उत्सव आपल्याला नेत असतो, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी योग विधेचे महत्वदेखील अधोरेखीत केले. तसेच देशातील नागरिकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
या भव्य मूर्तीची रचना आणि प्राण-प्रतिष्ठा ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी केली आहे. मूर्ती तयार करताना दगड न वापरता स्टीलचे तुकडे वापरण्यात आले आहेत. आजच्या कार्यक्रमात दोन लाख लोकांसह तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री इ. पलानीस्वामी, केरळच्या राज्यपाल किरण बेदी आदी मान्यवर उपस्थित होते.