
संग्रहीत छायाचित्र
Mumbai 9 July : मध्य रेल्वे, मुंबई विभाग दि. ११.७.२०२१ रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी आपल्या उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक परिचालीतकरणारआहे.
– ठाणे-कल्याण अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.०० पर्यंत
– डाउन धिम्या/अर्धजलद मार्गावर मुलुंड येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ दरम्यान सुटणाऱ्या सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविली जाईल व ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबून नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
-सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५१ दरम्यान कल्याण येथून सुटणारी अप धिम्या/अर्धजलद सेवा कल्याण व मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जातील व डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबून पुढे मुलुंड स्टेशनवर अप धिम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येऊन नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
-सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी / पोहोचणाऱ्या सर्व अप व डाउन सेवा नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी सुटतील/ पोहोचतील.
-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० दरम्यान आणि
-चुनाभट्टी / वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान
डाउन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ या कालावधीत वाशी / बेलापूर / पनवेलकरीता सेवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.०२ ते सायंकाळी ४.४३ दरम्यान वांद्रे / गोरेगावकडे जाण्या-या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
अप हार्बर मार्गावर पनवेल / बेलापूर / वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी गोरेगाव/ वांद्रे येथून सकाळी १०.१० ते सायंकाळी ४.५८ दरम्यान अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील.
तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे जाण्याची परवानगी आहे.














