पहिल्या टप्प्यातील १५ जि.प.साठी ४,२७८; १६५ पंचायत समित्यांसाठी ७,६९३ उमेदवार
मुंबई : राज्यातील १० महानगरपालिकांच्या हजार २६८ जागांसाठी ९ हजार १९९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत; तसेच पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या १५ जिल्हा परिषदेच्या ८५५ जागांसाठी ४ हजार २७८; तर १६५ पंचायत समित्यांच्या एकूण १ हजार७१२ जागांसाठी ७ हजार ६९३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
राज्यातील १० महानगरपालिकांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी दोन टप्प्यांत मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात १६ फेब्रुवारीला १५ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या१६५ पंचायत समित्यांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात ११ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या ११८ पंचायत समित्यांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेचा दोन्ही टप्प्यात समावेश असून पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यातील ८; तर दुसऱ्या टप्प्यात ४ पंचायत समित्या व त्यातील निवडणूक विभागांचा समावेश आहे. मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी२३ फेब्रुवारीरोजी होईल.
दुसऱ्या टप्प्यातील ११ जिल्हा परिषदांच्या ६५४ जागांसाठी छाननीनंतर ६ हजार ३६७ नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. ११८ पंचायत समित्यांच्या १ हजार २८८ जागांसाठी १० हजार ८७९ नामनिर्देनशपत्रे वैध ठरली आहेत. काही उमेदवार एकापेक्षा जास्त नामनिर्देशनपत्रे दाखल करतात; परंतु एखाद्याने कितीही नामनिर्देशनपत्रे दाखल केली असली तरी अंतिमत: प्रत्येकाचा एकच उमेदवारी अर्ज गृहीत धरला जातो. त्यामुळे नामनिर्देशनपत्रांच्या माघारीच्या अंतिम मुदतीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. ही मुदत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी १३ फेब्रुवारी ; तर अपील असलेल्या ठिकाणी १५ फेब्रुवारीपर्यंतअसेल.
महानगरपालिकानिहाय (कंसात एकूण जागा) उमेदवारांची संख्या : बृहन्मुंबई (२२७)-२,२७१, ठाणे (१३१)-१,१३४, उल्हासनगर (७८)-८२१, नाशिक (१२२)-१,०८९, पुणे (१६२)-६२३, पिंपरी-चिंचवड (१२८)-८०४, सोलापूर (१०२)-४७८, अकोला (८०)-५७९, अमरावती ८७)-६२६ आणि नागपूर (१५१)-७७४. एकूण (१,२६८)-९,१९९
पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदनिहाय (कंसात एकूण जागा) उमेदवारांची संख्या : अहमदनगर ७२)-३०३, औरंगाबाद (३२)-३२३, बीड (६०)-४४०, बुलडाणा (६०)-३३३, चंद्रपूर (५६)-३१४, गडचिरोली (३५)-१७६, हिंगोली (५२)-२४५, जळगांव (६७)-२४४, जालना (५६)-२६६, लातूर (५८)-२३१, नांदेड (६३)-३७४, उस्मानाबाद (५५)-२५४, परभणी (५४)-२७६, वर्धा (५०)-२९३ आणि यवतमाळ (५५)-३०६. एकूण जागा(८५५)- ४,२७८. याजिल्हा परिषदांतर्गतच्या १६५ पंचायत समित्या (१७१२)-७,६९३.