मुंबई, 10 जून : चीनमधील वाढती मागणी आणि जगभरातील आर्थिक कामकाज पुन्हा सुरू झाल्याने मंगळवारी कच्च्या तेलाच्या किंमती १.९६ टक्क्यांनी वाढून ३८.९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. ओपेक आणि रशियाने जुलै २०२० च्या शेवटच्या अखेरपर्यंत उत्पादन कपातीचा निर्णय घेतल्याने तेलाच्या किंमतींना आधार मिळाला. एप्रिल महिन्यात ओपेकने जागतिक पुरवठा जास्त झाल्याने तेलाच्या किंमतींना आधार देण्यासाठी मे-जून महिन्यात दररोज ९.७ दशलक्ष बॅरलने उत्पादन कपातीचा निर्णय घेतला घेतल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी नमूद केले.
ओपेक संघाने जून महिन्यात दररोज १.१८ दशलक्ष बॅरलची उत्पादन कपात केल्याप्रमाणे जुलै महिन्यात ही कपात केली जाणार नसल्याचे सांगितले. यामुळे क्रूडच्या नफ्याला थोडी मर्यादा आली. तसेच क्रूड इन्व्हेंटरीत वाढ होण्याच्या शक्यतेने किंमतींवर दबावही निर्माण झाला. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्यालाटेभोवती असलेल्या भीतीनेही अनिश्चिततेत वाढ केली. अधिकृत अमेरिकी क्रूड इन्व्हेंटरी डाटा आज प्रकाशित केला जाईल आणि या स्थितीला मार्गदर्शन करेल.
स्पॉट गोल्डच्या किंमतीही १.१६ टक्क्यांनी वाढून १,७१४ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून धक्कादायक भूमिका घेण्याची अपेक्षा असल्याने गुंतवणुकदारांनी सोन्यावर पकड घेतली. तसेच इतर प्रोत्साहनपर उपायांच्या अपेक्षेमुळे अमेरिकन डॉलरची घसरण झाली आणि इतर चलनधारकांना ते स्वस्त मिळाले. परिणामी सोन्याची मागणी वाढली. २०२० मध्ये बहुतांश मध्यवर्ती बँकांनी प्रभावी प्रोत्साहनपर पॅकेज जाहीर केल्याने सोन्याच्या दराला आधार मिळाला. आता सुधारणा अपेक्षित असताना, कदाचित पूर्वी अपेक्षा केल्यापेक्षा यासाठी जास्त कालावधी लागू शकतो. तसेच अनेक प्रोत्साहनपर पॅकेजची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांना सोने अधिक किफायतशीर ठरत आहे.
स्पॉट सिल्व्हरनेदेखील २.८ टक्क्यांची बढत घेतली. ते १७.९ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. एमसीएक्सवर चांदीने १.७६ टक्क्यांची वृद्धी करून ४८,१८५ प्रति किलोचा दर मिळवला. अमेरिकेतील मध्यवर्ती बँकेच्या बैठकीची बाजाराला प्रतीक्षा आहे. प्रोत्साहनपर पॅकेज आणि जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत सद्यस्थितीचे कसे नियोजन करता येईल, यावर ही बैठक होईल.