मुंबई, ३० जुलै २०२१: स्टॅनप्लस ही भारतातील आघाडीची प्रायव्हेट पेशंट लॉजिस्टिक्स आणि आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद विषयक कंपनी असून तिने विस्तारधोरणाची घोषणा केली आहे. कंपनी विस्तृत रेड अँम्ब्युलन्स नेटवर्क हैदराबाद आणि बंगळुरू येथे तयार केल्यानंतर आता तीच्या शाखा मुंबई, चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये विस्तारल्या जातील.
पुढील ५ वर्षांत कंपनीने आक्रमक विस्तार योजना आखलेली असून, देशातील जास्तीत जास्त लोकांना अत्याधुनिक सेवा पुरवण्यासाठी जास्तीत जास्त शहरांमध्ये वाहने वाढवली जातील. ग्राहकांच्या अखंड अनुभवासाठी कंपनी आपल्या सेवा क्षेत्राच्या कक्षा वाढवणार असून, पोर्टफोलिओत नवे ग्राहकही वाढवणार आहे. तसेच मार्केटमध्ये सखोल प्रवेश मिळवण्यासाठी धोरणात्मक मार्ग तयार करत बाजजारपेठेतला वाटा वाढवण्याचा कंपनीचा विचार आहे.
स्टॅनप्लसचे संस्थापक व सीईओ श्री प्रभदीप सिंग म्हणाले, “ बंगळुरू आणि हैदराबाद येथील आरोग्यसेवा क्षेत्रात सकारात्मक प्रभाव निर्माण केल्यानंतर इतर प्रमुख शहरांमध्ये रेड अँब्युलन्सचा ताफा विस्तारणे, ही स्टॅनप्लससाठीची पुढील प्रगतीचे उद्दिष्ट आहे. बाजारात सध्या अनेक नव्या कंपन्या प्रवेश करत आहेत मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मिळवलेल्या विश्वासाच्या आधारे बाजारात या क्षेत्रात आम्ही आघाडीचे स्थान मिळवलेले आहे.
ते पुढे म्हणाले, “आमची मूलभूत क्षमता, स्वत:च्या अत्याधुनिक रुग्णवाहिकांचा ताफा चालवणे आणि कर्मचारी आणि क्लिनिकल तज्ञांच्या बाबतीत उत्कृष्ट वैद्यकीय क्षमता या आधारेच आम्ही या स्पर्धेत वेगळे ठरतो. या विस्तारानंतर आमच्या अत्याधुनिक सेवांद्वारे जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत पोहोचणे आम्हाला शक्य होईल. परिणामी एक मोठा फरक दिसून येईल.”