
समाज भूषण पुरस्कार देऊन सुभाष गुडेकर यांना सन्मानित करताना कुंभार समाज उत्कर्ष समिती, मुंबईचे अध्यक्ष रत्नाकर सोनावणे.
रत्नागिरी : सुभाष गुडेकर यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना समाज भुषण या पुरस्काराने गौरविण्यात आले. गुडेकर हे रत्नागिरी जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष आहेत. कुंभार समाज उत्कर्ष समिती, मुंबईच्या वतीने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
गुडेकर हे २५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या कुंभार समाजाला एकत्र आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. या समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, यासाठी ते कार्यरत आहेत. समितीचे अध्यक्ष रत्नाकर सोनावणे यांनी समाज भुषण पुरस्कार देऊन गुडेकर यांना सन्मानित केले.