मुंबई : स्त्री शिक्षणाची बीजे देशात रोवणार्या थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती पालिकेत साजरी करण्यात आली. महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस महापौर स्नेहल आंबेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सुधार समिती प्रकाश गंगाधरे, नगरसेविका किशोरी पेडणेकर, नगरसेविका वंदना गवळी, नगरसेवक संपत ठाकूर, उप आयुक्त (सुधार) चंद्रशेखर चोरे आदी यावेळी उपस्थित होते.