रत्नागिरी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली. पवार हे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त चिपळूण येथे आले. यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. पायावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर आमदार जाधव यांच्या भेटीसाठी सर्वच पक्षांतील नेते मंडळींची त्यांच्या ‘सुवर्ण-भास्कर’ या निवासस्थानी भेटीसाठी जात आहेत. त्यामुळे जाधव हे राष्ट्रवादी सोडणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. शरद पवार यांच्या भेटीमुळे भास्कर जाधव राष्ट्रवादीतच राहणार की जाणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला.