
मुंबई : शिवाजी पार्क मैदानाच्या खेळपट्टीवर १०० तास फलंदाजीसाठी प्रयत्न करणारा क्रिकेटपटू मुकुंद गावडे
शिवाजी पार्क मैदानात क्रिकेटपटू मुकुंद गावडेची फलदांजी सुरू
मुंबई : आदिवासी तरुणांच्या विकासात खारिचा वाटा हा होईना, पण तो पेलता यावा यासाठी खेळपट्टीवर तब्बल १०० तास फलदांजी करण्याचा निश्चय मुकुंद गावडे या तरुण क्रिकेटपटूने केला आहे. त्यासाठी ४ जानेवारीपासून शिवाजी पार्क मैदानावर फलदांजी करण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाद्वारे मिळणारी रक्कम सफाळे येथील पेनंद परिसरातील आदिवासी भागात राहणार्या तरुणांच्या विकासाठी दिली जाणार आहे. तसेच १०० तासांच्या फलंदाजीचा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्नही गावडे करणार आहे.
गावडे (वय २४) हा किर्ती महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. आदिवासींच्या विकासासाठी तो रविवार ८ जानेवारीपर्यंत फलंदाजीसाठी खेळपट्टीवर उभा राहणार आहे. त्याला गोलंदाजी करण्यासाठी पनवेलमधून गोलंदाज जाणार आहेत. गावडेला प्रोत्साहन देण्यासाठी नगरसेवक नाना आंबोले यांनीदेखील २ षटके गोलंदाजी केली आणि रुपये ५५०० देणगी दिली.
कार्यक्रमातून या मुलांसाठी मदतनिधी उभारुन तो समन्वय सामाजिक संस्था या संस्थेस देण्यात येणार आहे. दानशूर व्यक्तींनी या उपक्रमाला मदत करावी असे आवाहन कीर्ती संजीवनी चैरिटेबल ट्रस्ट, समन्वय सामाजिक संस्था, सेंट जॉर्ज क्रिकेट क्लब अँड स्पोर्ट्स असोसिएशन,सुनील इलेवन क्रिकेट संघ, काळाचौकी, मुंबई, स्टार परफॉर्मर ग्रुप क्रिकेट अकादमी , कीर्ति कमिनाज़ ग्रुप यांनी केले आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
क्रिकेटजगताचा देव सचिन तेंडुलकर हा माझा प्रेरणास्त्रोत आहे. याच प्रेरणेने मी खेळत आहे. आदिवासी तरुणांना मदत करणे आणि सचिनला गुरुदक्षीणा देणे असा उद्देश यामागे आगे. – मुकुंद गावडे