वाहतूक कोंडी सुटण्यासाठी पालिकेचा आराखडा तयार
मुंबई : वांद्रे-खार लिंकिंग रोडचा कायापालट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे येथे होणारी वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. वास्तुविशारदाने बनविलेल्या आराखड्याला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. पादचार्यांना चालण्यासाठी व्यवस्थित रस्ता, भुयारी पादचारी मार्ग तसेच वाहनांसाठी पार्किंग यांचा समावेश आराखड्यात करण्यात आल आहे. परिसरात होणारी वाहतूक खोळंबून राहू नये यासाठीही आखणी केली गेली आह. लिकिंग रोडच्या आसपास असलेल्या अधिकृत दुकानांचेदेखील पुनर्वसन होणार आहे.
भूमिगत पार्किंगची व्यवस्था पटवर्धन उद्यानाखाली असणार आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. पुढील अडीच ते तीन वर्षात काम पूर्ण होईल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.