रत्नागिरी : खैराची तस्करी आज वनविभागाने उघड केली. मुंबई-गोवा महामार्गावर ही कारवाई झाली. यावेळी मोठ्या प्रमाणावर खैराचा साठा जप्त करण्यात आला.
महामार्गावर सावर्डे ते चिपळूण दरम्यान ४ ते ५ टन खैराचा साठा असलेला टेम्पो मालासह जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत १८ लाख रुपये इतकी आहे. टेम्पो सावंतवाडीहून मुंबईला निघाला असता चिपळूणच्या वनविभागाने ही कारवाई केली.