रत्नागिरी : लांजा शहरात असणार्या वैभव वसाहतीजवळील शेततळ्यात एकाचवेळी २६ साप आढळून आले. कोर्ले रस्त्याजवलच्या एका शेततळ्यात हे साप अधिवास करून होते. शेताला पाणी देत असताना संजय बांवधनकरांनी ते पाहिले. त्यांनी याची माहिती निसर्ग संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्याना दिली. त्यानंतर सर्व सापांना सुरक्षीत स्थळी सोडण्यात आले.