नवी दिल्ली : पेट्रोल पंपांवर डिजिटल व्यवहारासाठी, ग्राहक अथवा पेट्रोल पंप डिलर्सकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले. एम डी आर म्हणजे मर्चंट डिस्काऊंट रेट, ग्राहकांकडून घेतला जाणार नाही. यासंदर्भातली मार्गदर्शक तत्वे सरकारने फेब्रुवारी 2016 मधेच जारी केल्याचे ते म्हणाले. पेट्रोल पंपावरचे डिजिटल व्यवहार, ही बँका आणि तेल विपणन कंपन्या यांच्यातली बाब असून, ते यासंदर्भात निराकरण करतील, असेही प्रधान यांनी म्हटले आहे. पेट्रोल-पंपावरच्या डिजिटल व्यवहारांवर आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत पेट्रोल पंप डिलर्स संघटनेने उपस्थित केलेल्या मुद्यानंतर सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे.