मुंबई : महाराष्ट्रात मागील आठवड्यापासून पसरलेली थंडीची लाट अद्यापही कायम आहे. कुलाबा येथे १७.५ आणि सांताक्रुझमध्ये १३.५ तापमानाची नोंद झाली. तर कोकणात पारा १२ ते १७ अंशापर्यंत घसरला आहे. मागील २४ तासांत विदर्भामध्ये काही ठिकाणी तीव्र थंडीची लाट होती. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते.
कोकण-गोवा, मध्य-महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांतील तापमान :
तापमान (अंश सेल्सिअस) :
मुंबई (कुलाबा) १७.५, सांताक्रुझ १३.६, अलिबाग १६.६, रत्नागिरी १५.४, पणजी (गोवा) १९.०, डहाणू १२.६, भिरा १४.०, पुणे ९.३, अहमदनगर ९.०, जळगाव ७.४, कोल्हापूर १५.१, महाबळेश्वर ११.९, मालेगाव ७.२, नाशिक ७.४, सांगली १२.३, सातारा १०.६, सोलापूर ११.६, उस्मानाबाद ८.९, औरंगबाद ८.४, परभणी ९.१, नांदेड १२.०, बीड १०.२, अकोला ८.०, अमरावती ८.४, बुलढाणा ९.८, ब्रह्मपुरी ९.८, चद्रंपूर १०.०, गोंदिया ६.५, नागपूर ७.२, वाशिम ८.८, वर्धा ९.०, यवतमाळ ९.४.
राज्यात कमीतकमी किमान तापमान गोंदिया येथे ६.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
पुढील हवामानाचा अंदाज:
१४ जानेवारी : उत्तर मध्य-महाराष्ट्र-मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१५ जानेवारी : उत्तर मध्य-महाराष्ट्र-मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१६ – १७ जानेवारी : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. १४ जानेवारीला विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येऊ शकते.