मुंबई : मध्य-महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट तर कोकण-गोवा आणि विदर्भाच्या काही भागात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात कमी ककमान तापमान अहमदनगर येथे ४.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ४ ते ८ जानेवारी दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मागील २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले तापमान तापमान (अंश सेस्लिअस) खालीलप्रमाणे:
मुंबई (कुलाबा) १९.७, सांताक्रुझ १४.४, अलिबाग १७.०, रत्नागिरी १७.५, पणजी (गोवा) १९.०, डहाणू १६.३, महाबळेश्वर १३.२.