रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अखेर आज राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी शेकडो समर्थकांसह मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. कदम यांच्यासह माजी नगरसेवक राजू कदम, रमेश खळे, अमजद पटेल, रतन पवार, अमृत कालेकर ,लियाकत काद्री, महमद फकीर, हिंदूराव पवार,मिलिंद शिंदे, वासुदेव मिस्त्री, मुराद अडरेकर, उत्तम जाधव, स्नेहा जाधव, मानसी कदम शौकत परकार, विनोद शिंदे यांच्यासह जिल्ह्य़ातील शेकडो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी विनय नातू, जिल्हाध्यक्ष बाळ माने, तालुकाध्यक्ष रामदास राणे, उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, नगरसेविका रसिका देवळेकर, नूपुर बाचिम आदी उपस्थित होते. रमेश कदम यांच्या भाजपा प्रवेशाने चिपळूणमध्ये जि. प. आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे.