रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : रत्नागिरी शहराजवळ असणार्या मिरजोळे गावात एक नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. वनखात्याला माहिती मिळाल्यानंतर वन अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचा पंचनामा करून विल्हेवाट लावण्यात आली. भुकेने किंवा नैसर्गिक कारणाने बिबटया मरण पावला असावा, असा वनखात्याचा अंदाज आहे. बिबटयाचे वय अंदाजे साडेतीन ते चार वर्ष तर लांबी पाच फूट लांबी होती.
वन विभाग अधिकारी लक्ष्मण गुरव, सरपंच राजेश तोड़णकर, उपसरपंच गणेश पाडावे तसेच महेश पाटील गजानन गुरुव, वैभव पाटील, विकास पाटील, तेजल पाटील रजनीकांत पंड़्ये, राजेंद्र झगडे आदी यावेळी उपस्थित होते. .