
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : रत्नागिरी शहरात शुक्रवारी मध्यरात्री तब्बल आठ दुकाने फोडत हजारोंचा ऐवज चोरांनी लंपास केला. मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गोखले नाका परिसरातील दुकानांत हा प्रकार घडला. भिडे यांचं योजक कोकणमेवा, रत्नागिरी वाईनमार्टसह कपड्याच्या दुकांनावर चोरांनी डल्ला मारला. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यानुसार दोघेजण या प्रकारात सामील असल्याचे समोर आले आहे. चोरांचा कसून शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोर दुचाकीवरून आले. सळी आणि पकडीच्या सहाय्याने दुकानांचे टाळे तोडत त्यांनी आत प्रवेश केला. दुकानांच्या गल्ल्यामध्ये असणारे पैसे त्यांनी चोरले. सकाळच्या सुमारास दुकानदार आल्यावर हा प्रकार उघड झाला.