रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील मौजे कडवई येथील नजीर जुवळे यांच्या घरासमोरील नदीचे पात्रात शासकीय जागेत ज्या ठिकाणी अंत्यविधी केला जातो त्या वादग्रस्त जागेत मृताचे दहन, दफन करून किंवा अन्य तऱ्हेने त्यांची विल्हेवाट लावण्यास मनाई करणारा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 35 प्रमाणे 09 सप्टेंबर 2021 रोजीपासून 07 नोव्हेंबर 2021 पर्यंतच्या कालावधीसाठी जारी केला आहे. मौजे कडवई येथील अधिकृत स्मशानभूमीपैकी वाणीवठार व कडवई बाजारपेठ येथील ग्रामस्थांनी ‘देण’ येथील संन.502 हिनं 14 क्षेत्र 0.16.0 जागेचा वापर प्रेतांचे अंत्यविधीसाठी करावा, असेही आदेशात म्हटले आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलस अधिनियम 1951 चे कलम 133 अन्वये शिक्षेस पात्र राहील, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.














