रत्नागिरी : मोटार वाहन अधिनियम १९८९ च्या नियमांत अंतर्भूत असणार्या विविध कामकाजांच्या शुल्कांमध्ये ५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली. त्या विरोधात जिल्ह्यातील चारही प्रमुख रिक्षा संघटनांनी मंगळवारी रिक्षा बंद आंदोलन केले. दहा ते बारा हजार रिक्षा चालक सरकारच्या विरोधात सहभागी झाले होते.
केंद्र आणि राज्य सरकारने रिक्षा व अन्य वाहनांच्या परिवहन विभागाकडील शुल्कात वाढ केली. त्या बाबतची अधिसूचना २९ डिसेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध केली गेली.ही शुल्कवाढ अन्यायकारक आहे, असे म्हणत राज्यभरातील रिक्षा संघटनांनी आंदोलन केले. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. एकही रिक्षा थांब्यावर दिसली नाही.
“सरकारने मागण्या मान्य न केल्यास आक्रमक भूमिका घेऊ, अशी माहिती शिवसेना पुरस्कृत रिक्षा संघाचे उपाध्यक्ष अविनाश कदम यांनी दिली.