
कळंबोली : के.एल.ई. कॉलेजचा विद्यार्थी आयुष शिंदे याने ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतर-महाविद्यालयीन कोकण (झोन चार) विभागीय स्तरावरील वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
“त्याने 85 किलो वजन उचलले. निवड चाचणीमध्ये आयुषची निवड केली गेली. के.एम.सी. कॉलेज, खोपोली येथे 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंतर-विभागीय स्पर्धेत आयुष कोकण झोनचे प्रतिनिधित्व करेल. ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर आणि कोकण हे ४ झोन आंतर विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी एकत्र खेळणार आहेत,” अशी माहिती क्रीडा समन्वयक प्रदीप मैलागीर यांनी दिली.
के.एल.ई. कॉलेजचे प्राचार्य डॉ. जी.डी.गिरी, श्री. दिपेश पिल्लइ, क्रीडा प्रशिक्षक प्रदीप मैलागीर, सर्व शिक्षक,विद्यार्थी, मित्र आणि नातेवाईक सर्वानी आयुष शिंदेचे त्याच्या यशाबद्दल अभिनंदन केले.