बोर्डाच्या परीक्षा मार्चमध्ये असल्याने निर्णय
मुंबई : मुंबई, ठाणे सह राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीतच होतील, असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी स्पष्ट केले. दहावी आणि बारावी या बोर्डाच्या परीक्षा मार्चमध्ये असतात. त्यामुळेच निवडणुका फेब्रुवारीमध्ये घेण्याचा निर्णय झाला, असे सहारिया यांनी सांगितले.
पालिका निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे. त्याचप्रमाणे संबंधित महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या गेल्या आहेत. निवडणूक तारखेबाबत येत्या काही दिवसांत अधिकृत घोषणा केली जाईल असेही ते म्हणाले. दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती, सोलापूर या महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत होतील.