डोंबिवली : मध्य रेल्वेची वाहतूक आज दुपारी पुन्हा एकदा विस्कळीत झाली. परंतु, यावेळी तांत्रिक कारण नसून रेल्वे प्रशासनाने कोपर रेल्वे स्थानकाजवळ असणार्या झोपड्यांवर केलेली कारवाई निमित्त ठरली. या कारवाईच्या निषेधार्थ झोपडपट्टीतील नागरिकांनी आंदोलन करत रेल रोको केले. परिणामी अप आणि डाऊन हे दोन्ही मार्ग ठप्प झाले आहेत.
डोंबिवली आणि कोपर स्थानकाजवळ रेल्वेच्या जागेवर सिद्धार्थनगर ही झोपडपट्टी वसलेली आहे. तेथील रहिवाशांना रेल्वेतर्फे कारवाईची नोटीस बजावण्यात आली. झोपड्या तोडण्याची कारवाई करताना रहिवाशांनी निषेध केला आणि रुळांवर उतरत रेल्वे रोखली.