नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिध्द क्रिकेटपटू आणि भाजपाचे माजी खासदार नवज्योत सिंग सिद्धू कोणत्या पक्षात प्रवेश करणार, या बाबत असणारी उत्सुकता अखेर आज संपुष्ठात आली. सिद्धू यांनी भाजपाचा कट्टर प्रतिस्पर्धी असणार्या कॊंग्रसमध्ये प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सिद्धू यांची पत्नी नवज्योत यांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात कॊंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे सिद्धू याच पक्षात प्रवेश करतील, असा अंदाज वर्तविला जात होता. कॊंग्रेसचे राष्ट्रीय़ उपाध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेतल्यानंतर सिद्धू यांनी पक्षात प्रवेश केला.
“भारतीय कॊंग्रेस पक्षाने सिद्धू यांचे कॊंग्रेस परिवारात स्वागत केले आहे. आम्ही कॊंग्रेसच्या उपाध्यक्षांचे धन्यवाद मानतो, कारण त्यांच्या दूरदृष्टीमुळेच सिद्धूंसारख्या लोकप्रिय व्यक्ती कॊंग्रेसच्या छ्त्राखाली येत आहेत,” असे पक्षाचे प्रवक्ता रणजितसिंह सूरजेवाला यांनी म्हटले आहे.