रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : समुद्रामध्ये वाहणार्या सोसाट्यांच्या वार्यांमुळे गुहागर येथील समुद्रात मासेमारी करणारी एक मच्छीमारी नौका आज बुडाली. नौकेवर सहा खलाशी होते. त्यांना वाचविण्यात मच्छीमारांना यश मिळाले. या घटनेत कोणतिही जीवितहानी झाली नाही. नौका बुडाल्याने जवळपास 17 लाखांचे नुकसान झाले.
अख्तरी होडेकर यांच्या मालकीची ती बोट होती. अल मुजदफा ही नौका समुद्रात मच्छीमारी करत होती. याचवेळी अचानक वेगाने वारे वाहू लागेल. वाहणार्या वार्यांचा वेग इतका जबरदस्त होता की, त्यापुढे नौकेला टिकाव धरता आला नाही आणि ती बुडाली.