चिपळूण – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या चिपळूण शाखेच्या “रोझी सागर” येथील नूतन कार्यालयाचा उद्घाटन रविवार दिनांक ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होईल. रोझी सागर येथील कार्यालयाच्या उदघाटन समारंभानंतर मुख्य कार्यक्रम चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात होणार आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे आमदार सदानंद चव्हाण, सभापति स्नेहा मेस्त्री, चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे, गटविकास अधिकारी वान्मती सी., सहायक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले,गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण, जिल्हा शिक्षण समिति सदस्य सुनिल दळवी, चिपळूण शिक्षण सल्लागार समिति सदस्य विलास महाडीक उपस्थित राहणार आहेत.
यावेळी दिनदर्शिचे प्रकाशन होईल. दिनदर्शिकेत “चिपळूण तालुका पर्यटन” हा पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर व विलास महाडीक यांचा अभ्यासपूर्ण लेख, तसेच शालेय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांची माहिती क्रीडांगणाची मापे, नियम,दिनविशेष, शालेय अभिलेखे, पंचांग, आदि प्रकारची माहिती समाविष्ट आहे. तिची निर्मिती नियोजन समितिचे प्रमुख सदस्य संतोष कदम, बाळासो भोसले , मंदार ओक, चंद्रकांत जंगम, श्री रविंद्र मोहिते, विकास महाडीक, दत्ताराम भंडारी यांनी केली आहे. समारंभास तालुक्यातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चिपळूण समितीचे अध्यक्ष मनोज मस्के, सरचिटणीस मिलिंद चव्हाण यांनी केले आहे.