नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले. आगामी काळात यशाची नवी शिखरे गाठण्याच्या दिशेने अमेरिकेचे नेतृत्व करण्यासाठी ट्रम्प यांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
भारत – अमेरिका धोरणात्मक भागीदारीचे सामर्थ्य आपल्या समान मूल्य आणि हातामध्ये आहे . भारत अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि आपल्या सहकार्याच्या क्षमतांचा पूर्ण वापर करण्यासाठी राष्ट्राध्यक्षांबरोबर काम करायला मी उत्सुक आहे.”असेही पंतप्रधान म्हणाले.