देशांत भयंकर आर्थिक परिस्थिती, असे म्हणत भाजपावर साधला निशाणा
मुंबई : ती सध्या काय करते? या मराठी सिनेमाने रसिकांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शिवसेनेला अखेर सापडले. या उत्तरातून शिवसेनेने भाजपावर निशाना साधला आणि नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर तीव्र टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून ’ती सध्या काय करते’ या मथळ्याखालील अग्रलेखातून नोटाबंदीनंतर देशात भयंकर आर्थिक परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे भाजपसोबत सत्तेत वाटेकरी असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा विरोधकाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे.
पन्नास दिवसांपासून ‘ती’ बिच्चारी रांगेतच उभी आहे आणि परिस्थितीशी झगडत आहे. भविष्याच्या चिंतेने देशातील स्त्रीयांना ग्रासले आहे. असे शिवसेनेने सांगितले आहे. ‘ती सध्या काय करते?’ या प्रश्नाचे उत्तर सिनेमाच्या पडद्यावर वेगळे व प्रत्यक्ष जीवनात वेगळे आहे, अशी तीव्र टीका शिवसेनेने भाजपाच्या नोटाबंदीच्या निर्णयावर केली आहे.

देशात आर्थिक विकासाचा वेग कमी झाला असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. तसेच काँग्रेजी राजवटीत जे भोगायला लागले नाही ते स्वकीयांच्या राजवटीत भोगावे लागत आहे, असे म्हणत भाजपाची राजवट जुलमी असल्याचे अप्रत्यक्ष सुचविण्यात आले आहे. नोटाबंदीमुळे बाजारपेठ मंदावली आहे. आर्थिक विकासाचा वेग कमी झाला आहे. त्याचा फटका अनेक छोटय़ा-मोठय़ा व्यवसायांना बसला आहे. या व्यवसायांतील अनेकांना रोजगाराला मुकण्याची वेळ आली आहे. बेरोजगारीची टांगती तलवार डोक्यावर आहे असेही सेनेचे म्हणणे आहे. नोटाबंदीमुळे दहशतवाद कमी झाला ही अफवा आहे, असे म्हणून भाजपावर वार करण्यात आला आहे. परिवर्तनाची नवी पहाट आणि ‘अच्छे दिन’चा हा भरकटलेला प्रवास आहे, असेही सांगण्यात आले आहे.
कोकणवृत्तचे विश्लेषण
नोटाबंदीनंतर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीला भाजपाच जबाबदार आहे, कोणत्याही उपययोजना न केल्याने देश आर्थिक खाईत सापडला आहे, असे शिवसेनेला सूचवायचे आहे. देशात विकासाचा वेग मंदावल्याने बेरोजगारी निर्माण होण्याची भिती आहे. स्त्रीया परिस्थितीशी झगडत आहेत आणि त्यांचे भविष्य अंधकारमय होणार की काय? अशी चिंता त्यांना लागून राहिली आहे. देशातील कुटूबे भयंकर अवस्थेत जीवन जगत आहेत, असे शिवसेनेचे म्हणणे म्हणजे भाजपा सरकारच्या काळात नागरिकांचे कसे हाल होत आहेत? तरिही सरकार काहीच करत नाही, हे दर्शविण्यासारखे आहे. कॊंग्रेसच्या राजवटीतदेखील अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागला नाही. म्हणजेच भाजपपेक्षा कॊंग्रेसची राजवट बरी होती, असेच शिवसेनेला सूचवायचे आहे. भाजपा म्हणते दहशतवाद कमी झाला, पण सीमेवर जवान हुतात्मा होत आहेतच, असे म्हणत शिवसेनेने तो दावा खोडून काढला आहे.
शिवसेना हा सत्ताधारी पक्ष आहे. भाजपासोबत तो सत्ता उपभोगत आहे. परंतु, त्याचबरोबर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा निषेध करत आहे. नोटाबंदीनंतर निर्माण झालेली परिस्थिती शिवसेनेने लोकांसमोर आणून स्वत:च्याच सरकारचे जाहीर वाभाडे काढले आहे.