रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : गुहागर तालुक्यातील तवसाळ-जयगड खाडीमध्ये डॉल्फीन मासा मृतावस्थेत सापडला. त्याची लांबी पाच फुट होती. सोमवारी सायंकाळी तो तवसाळ येथील फेरीबोटीच्या जेटीजवळ आढळला. जयगड खाडीमधून तो मृतावस्थेत वाहत आला. दुपारच्यादरम्यान काही पर्यटक फिरण्यासाठी तवसाळ येथे आले होते. त्यांनी या माशाला किनार्यावर आणला. डॉल्फीनचा मृत्यू नक्की कशामुळे झाला असावा, हे स्पष्ट झाले नाही. मोठ्या जहाजाची धडक लागल्याने डॉल्फीनचा मृत्यू झाला असावा असा अंदाज स्थानिक मासेमारांनी व्यक्त केला.