रत्नागिरी ( विशेष प्रतिनिधी) : गुहागर पोलिसांनी घेतलेल्या रेझिंग डेचा आज समारोप करण्यात आला. कबड्डी, पाककला, वक्तृत्व, रांगोळी या स्पर्धा त्यानिमित्त घेण्यात आल्या. महिलांची विशेष रॅलीदेखील काढण्यात आली. गुन्हेगारांचा प्रतिकार करण्यासाठी पोलीस वापरत असलेल्या शस्त्रांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. कोकणातील खाद्य संस्कृतीसह फुल-झाडे आणि दुर्मिळ वनस्पतींचे प्रदर्शनही भरविण्यात आले.
सांगता समारंभासाठी कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरांडे, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक प्रणय अशोक आणि डीवायएसपी महादेव गावडे उपस्थित होते. गुहागरमधील स्थानिक कलाकारांनी कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. गुहागरचे पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांचे कौतुक बुरांडे यांनी केले.