रत्नागिरी : क्रिडा विभाग इमारतीच्या गच्चीवर ठेवण्यात आलेल्या लाकडांना आज अचानक आग लागली. रत्नागिरीतल्या शिवाजी स्टेडीयम जवळ हे कार्यालय आहे. बॅडमिंटन कोर्टच्या लाकडी फळ्या गच्चीवर ठेवण्यात आल्या होत्या. या फळ्यांनी अचानक पेट घेतला. त्यामुळे धुराचे लोण पसरले. खबरदारीचा उपाय म्हणून बॅडमिंटन कोर्टवर खेळणारे आणि व्यायामशाळेत असणार्यांना तातडीने बाहेर नेण्यात आले. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली. आग लागण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.